केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दर ४ महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत वर्षाला ६००० रुपये दिले जातात. दरम्यान आता २०वा हप्ता देण्यात आला आहे. पुढचा हप्ता लवकरच दिले जाणार आहेत.
शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेत २१ वा हप्ता दिला जाणार आहे.या योजनेत ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. दरम्यान, काही शेतकऱ्यांना २१वा हप्ता मिळणार नाही. या योजनेत कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत ते जाणून घ्या.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही २१वा हप्ता
देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. २०वा हप्ता दिल्यानंतर आता शेतकरी २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येतील. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. यामुळे लवकरात लवकर केवायसी करा.
आधार नंबर, बँक डिटेल्स किंवा नावात जर चुकी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा पूर्ण रेकॉर्ड योग्य असायला हवा आणि अपडेट होणार गरजेचे आहे.
जर तुमच्या रेकॉर्डमधील माहिती आणि केवायसीमधील माहिती मॅच झालेली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. या योजनेतील लाभार्थ्यांना eKYC पूर्ण करणे गरजेचे आहे.


