Thursday, February 19, 2026

३० लाख शेतकऱ्यांना झटका, २००० रुपये झाले बंद; पीएम किसान योजनेतून वगळले, कारण ?

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेतून लाखो शेतकऱ्यांना आता वगळण्यात आले आहे. कोट्यवधी शेतकरी पीएम किसानच्या २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यातच आता लाखो लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही निकषांमध्ये बसायला हवे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आणि बँक अकाउंट लिंक असायला हवे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ३०,१८,३६१ शेतकऱ्यांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नाहीये. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना २२वा हप्ता मिळणार नाही.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांची लिस्ट जारी केली आहे. लिस्टमधील माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील १० लाख शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक केलेले नाही. महाराष्ट्रातील जवळपास १,७२, ३४९ शेतकऱ्यांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार नाहीये.

आधार आणि बँक अकाउंट लिंक करणे गरजेचे

शेतकऱ्यांनी बँक अकाउंट लिंक करायचे आहे. हे काम तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करु शकतात.

ऑनलाइन प्रोसेस

सर्वात आधी तुम्हाला बँकेच्या साइटवर जायचे आहे. तिथे तुम्हाला आधार सिडिंग किंवा अपडेट असा ऑप्शन दिसेल.

बँक अॅपवर जाऊन लॉग इन करुन आधार लिंकचा ऑप्शन निवडा.

याचसोबत तुम्ही UIDAI पोर्टलवर जाऊनदेखील आधार लिंक करु शकतात.

ऑफलाइन प्रोसेस

सर्वात आधी तुम्हाला बँकेच्या शाखेत जायचे आहे. यानंतर आधार कार्ड आणि पासबुक दाखवायचे आहे.

यानंतर बँकेने दिलेला आधार लिंक फॉर्म भरा.

यानंतर एसएसएस किंवा एटीएमद्वारे आधार लिंक करु शकतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles