Friday, October 31, 2025

अहिल्यानगर शहरात आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारा पोलिसांच्या जाळ्यात

अहिल्यानगर -कायनेटीक चौकातील स्वप्निल साईसुर्या परमीट रूम अ‍ॅण्ड फॅमिली रेस्टॉरन्ट येथे शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकून आयपीएल सामन्यावर सट्टा (बेटिंग) लावत असलेल्या एकाला पकडले. शुभम दत्तात्रय भगत (वय 32 रा. जे. जे. गल्ली, मंगलगेट) असे त्याचे नाव आहे.मंगळवारी (29 एप्रिल) रात्री दिल्ली कॅपिटल्स विरूध्द कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अंमलदार सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून शुभम भगत विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून मोबाईल, सिमकार्ड, बनावट आधारकार्ड असा 16 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्य प्राथमिक तपासात शुभम भगत याने स्वतःच्या मोबाईलवर 23 आयडी तयार करून, त्याचप्रमाणे 16 मोबाईल नंबरच्या माध्यमातून सट्टा लावत असल्याचे उघड झाले.

त्याने आयपीएल क्रिकेट बेटिंगसाठी चार मोबाईल हॅण्डसेट, स्वत:चे व बनावट दुसर्‍यांच्या नावाचे दोन आधार कार्ड, बुकी संपर्क यादी आणि कॉलिंग आयडी यादी वापरल्याचे निष्पन्न झाले. यापैकी दोन सिमकार्ड खोटी ओळख दर्शवून घेतल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सुचनेनुसार आणि उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, अंमलदार सुयोग सुपेकर, सचिन जाधव, किरण बनसोडे, हेमंत खंडागळे, सागर व्दारके यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड हे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles