Monday, March 16, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस पाटलाला कोयत्याने मारहाण; ६ जणांवर गुन्हा दाखल

नेवासा -पोलीस पाटील पदाच्या २०१३ मध्ये झालेल्या परीक्षेचा फॉर्म भरल्याचा राग मनात ठेवून गोयगव्हाणचे पोलीस पाटील सुनील ठॉबळ यांच्यावर कोयत्याने वार करून लोखंडी रॉड व काठ्यांनी जबर मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात दोन महिलांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गोयगव्हाणचे पोलीस पाटील सुनिल साउजी ठोंबळ. (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, रविवारी सकाळचे सुमारास मी माझे घराचे समोर असताना व माझी पत्नी कांता आमचे घरापासुन जवळ राहत असलेल्या चंद्रकला बबन शिंदे यांचे घरी पापड करण्यासाठी गेली असताना माझे घराचे समोर प्रदीप रावसाहेब ठोंबळ हा मोटरसायकल वरुन येऊन मला म्हणाला की, तू लई गावाचा पोलीस पाटील झाला का? तू पोलीस पाटील पदाचे वेळी देखील आम्हाला नडला आणि आता आम्हाला शेतात जाणे येणेकरीता तहसीलदार यांनी दिलेली निकालाची प्रत घेऊन कोर्टातून दावा स्टे ऑर्डर घेतोय काय? आम्ही आमचे बाजूने निकाल लावणेसाठी पाच लाख रुपये घातले आहेत. तुमचे दोघा नवरा बायकोकडे पाहावे लागते. तुझी बायको कांता ही चंद्रकला शिंदे हिचेकडे गेली आहे. तिकडेच तिचा काटा काढतो असे म्हणून गोयेगव्हाण ते बिरोबा मंदिर रोडने त्याचे मोटरसायकलवर जोरात निघुन गेला.तेव्हा मला वाटले की तो, पत्नी कांता हिला मारहाण करील म्हणून मी पाठीमागून बिरोबा मंदिराकडे पायी गेलो असता तेथुन ठोंबळ व शिंदे वस्तीकडे जाणारे रोडने जात असतांना समोरुन महिंद्रा बोलेरो चारचाकी वाहन मधुन अनिल रावसाहेब ठोंबळ, तेजस अनिल ठोंबळ, शुभम प्रदीप ठोंबळ, वंदना अनिल ठोंबळ, सविता प्रदीप ठोंबळ, व मोटरसायकलवर प्रदीप रावसाहेब ठोंबळ. (सर्व रा. गोयेगव्हाण) हे आले म्हणाले की, याला धरा हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी नडत आहे. याला आज सोडायचे नाही. हा आपले रस्ता केसच्या निकालाचे विरोधात कोर्टात जाणार आहे. असे म्हणून शिवीगाळ करुन शुभम ठोंबळ याने त्याचे हातातील कोयता माझे डोक्यात जोरात मारला. प्रदीप ठोंबळ याने लोखंडी गजाने, तेजस ठोंबळ याने बॅटने अनिल ठोंबळ याने लोखंडी व इतर सर्वांनी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्‌यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

लोखंडी कोयत्याने, गजाने डोक्यात पाठी पोटावर, हातापायावर, माझे उजवे पायाचे नडघीला फ्रैक्चर करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरुन वरील सहा जणांवर भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८ (२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles