तोफखाना पोलीस ठाणे हद्दीमध्ये तिरट जुगाराचे अड्डयावर छापा, 21 आरोपींकडुन 4,93,880/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर शहरातील बागडपट्टीत ढोणे गल्लीतील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. २१ जणांना जुगार खेळताना पकड़ले. ४ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त. सुपे पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या पथकाची कारवाई. अहिल्यानगर शहर, जिल्ह्यातील विविध तालुके आणि बीड जिल्ह्यातील लोकही येथे जुगार खेळताना आढळून आले. ढोणे गल्लीत जुन्या वाड्यात हा जुगार अड्डा सुरू होता.
मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बागडपट्टी, ढोणे गल्ली ता. जि. अहिल्यानगर या ठिकाणी जुने वाड्याचे भिंतीचे आडोशाला काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार सुपा पोलीस स्टेशनच्या म.पो.नि./ज्योती गडकरी यांना बातमीतील ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेशीत करण्यात आले होते.
सदर आदेशानुसार म.पो.नि. ज्योती गडकरी नेम – सुपा पोलीस ठाणे, पोलीस अंमलदार खंडेराव शिंदे, कल्याण लगड, सारंग वाघ, गणेश डोंगरे, प्रशांत दिवटे, योगेश सातपुते, विशाल कुलकर्णी अशांनी बातमीतील ठिकाणी बागडपट्टी, ढोणे गल्ली ता. जि. अहिल्यानगर या ठिकाणी जुने वाड्याचे भिंतीचे आडोशाला काही इसम पत्त्यावर पैसे लावुन हार जितीचा जुगार खेळतांना दिसुन आले. पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन 1) संजीव रामचंद्र राऊत रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर, 2) अमर रुपा छाडेकर रा. पारधी, ता. जामनेर, जि. जळगांव, 3) गणेश प्रल्हाद चोभे रा. बागडपट्टी ता. जि. अहिल्यानगर, 4) राहुल प्रकाट भट रा. तेलीखुंट, ता. जि. अहिल्यानगर, 5) यशवंत पंढरीनाथ ढोणे रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर, 6) हेमंत गणेश गायकवाड रा. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापुर, 7) समाधान श्रीमंत सुरवसे रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड, 8) जिजाबा रखमाजी भोसले रा. पांडे, ता. करमाळा, जि. सोलापुर, 9) अशोक विश्वनाथ चोभे रा. केडगांव, ता. जि. अहिल्यानगर, 10) विशाल रोहिदास नाकाडे रा. कोठी, माळीवाडा, ता. जि. अहिल्यानगर, 11) प्रेमशंकर गणेशलाल कश्यप रा. बागडपट्टी, ता. जि. अहिल्यानगर, 12) मोहन दत्तु गोरे रा. बागडपट्टी ता. जि. अहिल्यानगर, 13) सतिष परशुराम जेजुरकर रा. लोंढे मळा, केडगांव, ता. जि. अहिल्यानगर, 14) अशोक बबन घोगरे रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड, 15) तुषार अशोक लड्डा रा. अडतेबाजार ता. जि. अहिल्यानगर, 16) सुरज अशोक यादव रा. भिसेगांव, ता. कर्जत, जि. रायगड, 17) श्रीमंत निवृत्ती सुरवसे रा. नवगण, राजुरी, ता. जि. बीड, 18) जिशानखान मंजुरखान पठाण, रा. बेलदार गल्ली, ता. जि. अहिल्यानगर, 19) अमोल महादेव कांबळे रा. राशीन ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, 20) राजु रामदास जगताप रा. राशिन ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, 21) रिंटु नंदेलाल महातो रा. विहार अशांना ताब्यात घेतले आहे.
ताब्यातील इसमांकडुन 4,93,880/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम, 20 मोबाईल, जुगाराची साधने जप्त करण्यात आली असुन आरोपीविरुध्द तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं.83/2026 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सुपा, नगर तालुका, तोफखाना, पारनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


