अहिल्यानगर-जामखेड येथील हॉटेल कावेरीमध्ये गोळीबार करणार्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे.
जामखेड-बीड रोडवरील हॉटेल न्यू कावेरी येथे दि. १८ डिसेंबर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता. यात रोहित अनिल पवार हे जखमी झाले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कबाडी यांना तपास पथक नेमले होते.आरोपीचा शोध घेत असताना आरोपी उल्हास उर्फ वस्ताद विलास माने (वय ४९, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) यास आष्टी या ठिकाणी जाऊन अटक करण्यात आले.
त्यानंतर उर्वरीत आरोपी शुभम शहाराम लोखंडे (वय २६, रा. आष्टी कमान वेशीसमोर, आष्टी, ता. आष्टी, जि. बीड), बालाजी शिवाजी साप्ते (वय २७, रा. तेली गल्ली, पांढरे मेडिकलचे पाठीमागे, आष्टी) यांना वाळुंज गावच्या शिवारात अहिल्यानगर ते सोलापूर जाणार्या रोडवरील हॉटेल शाम परिसरामधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा,हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआर, असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींना जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरील ताब्यातील आरोपींचे कब्जातुन गुन्ह्यामध्ये वापरलेला 30,000/- रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 20,000/- रुपये किमतीचा फिर्यादीचा काढुन नेलेला सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचा डी.व्ही.आर. असा एकुण 50,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपींना जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 669/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 189(2), 191 (2), 190, 324(5), 351(2)(3) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी जामखेड पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.


