Tuesday, February 24, 2026

नगर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर पोलिसांची मोठी कारवाई : 9 आरोपींवर गुन्हे दाखल, लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर – स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर 8 ठिकाणावर छापा टाकुन 3,84,503 रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि किरणकुमार कबाडी यांनी तपास पथकातील पोउपनि संदिप मुरकुटे, दिपक मेढे, पोलीस अंमलदार, राहुल द्वारके, गणेश लबडे, बिरप्पा करमल, दिपक घाटकर, राहुल डोके, रिचर्ड गायकवाड, रमीजराजा आत्तार, भगवान थोरात, विशाल तनपुरे, सतिष भवर, सुनिल मालणकर, अमोल कोतकर मनोज साखरे, महिला पोलीस अंमलदार, सुवर्णा गोडसे, ज्योती शिंदे, चालक महादेव भांड, भगवान धुळे अशांचे वेगवेगळे पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले.

दिनांक 23/01/2026 रोजी पथकाने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारु, अवैध गॅस रिफिलींग, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्रात बंदी असलेला अवैध गुटखा, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारु, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत देशी व विदेशी दारु, श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी/विदेशी दारु विक्री करणारे इसमांची माहिती काढुन छापे टाकुन खालील कारवाई केली आहे.

अ.क्र. पो.स्टे. गुरनं जप्त मुद्देमाल आरोपीचे नाव

1 श्रीरामपुर शहर 51/2026 बी.एन.एस. कलम 125,287,288 सह. जि.व.कायदा कलम 3 व 7 प्रमाणे 1,39,000 रु 1) लुकमान अमजद पठाण वय-24 वर्षे रा. वार्ड नं.2 बजरंग चौक, श्रीरामपुर 2)सलमान रशीद पठाण वय-28 वर्षे रा. मिल्लतनगर

2 श्रीरामपुर शहर गु.र.नं. 50/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई)(फ)(क)(ड) प्रमाणे 26,800 रु . 1) सुरक्षा संतोष जाधव रा. सरस्वती कॉलनी, देवकरवस्ती, वार्ड नं.7 श्रीरामपुर

3 श्रीरामपुर शहर गु.र.नं. 49/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई)(फ)(क)(ड) 19,500 रु 1) मथुराबाई रावसाहेब गायकवाड, रा. वडारवाडा, वार्ड नं.1 गोंधवणी श्रीरामपुर

4 कोपरगाव शहर गु.र.नं.32/2026 बी. एन. एस. कलम 223, 275, 277 प्रमाणे 87,398 रु. नितीन शिवराज शिंगाणे वय-21 रा.कृष्णानगर धारणगाव रोड, ता.कोपरगांव

5 कोपरगाव तालुका गु.र.नं.18/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे 27,500 रु. अलका दशरथ दांडेकर रा. धामोरी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर

6 राहुरी गु.र.नं.62/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे 14,445 रु. अंकुश खंडु ढाकणे वय- 30 वर्षे रा.चिंचाळे ता. राहुरी जि. अहिल्यानगर

7 राहुरी गु.र.नं.63/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे 4,400 रु.भाऊराव लहानु पवार रा.चिंचाळे ता. राहुरी जि. अहिल्यानगर

8 श्रीगोंदा गु.र.नं.73/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे 65,460 रु. दादासाहेब महादेव डोके वय- 44 वर्षे रा. आढळगाव ता. श्रीगोंदा, एकुण 8 गुन्हे दाखल 3,84,503 मुद्देमाल जप्त, 9 आरोपीविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles