Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर नावावरून राजकारण तापलं, संग्राम जगतापांचं मुख्यमंत्र्यांसमोर जनतेला आवाहन

आम्ही अहिल्यानगरचं नाव बदलू देणार नाही: आ. संग्राम जगताप
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. गुरुवारी युतीच्या उमेदवारांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत बोलताना अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नामांतरावरुन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत अहिल्यानगर शहराचे नाव बदलून देणार नसल्याची ग्वाही दिली आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, जिल्ह्याचे नामांतरण झाल्यापासून ही पहिली महापालिका निवडणुक होत असून युती विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवत आहे मात्र दुसऱ्या बाजूला काही लोक सांगत आहे की, जर आमच्या विचाराचे लोक निवडून दिले तर आम्ही पुन्हा एकदा जिल्ह्याचा नाव बदलणार त्यामुळे आता 15 जानेवारी रोजी आपल्या मतदानाच्या माध्यमांतून दाखवायचा आहे की आपल्याला काय मान्य आहे असं या सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले. तसेच जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही अहिल्यानगरच नाव बदलून देणार नाही अशी ग्वाही देखील आमदार जगताप यांनी दिली. आमदार जगताप म्हणाले की, आम्ही विकास करत आहोत आणि पुढे देखील करणार. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती झाली असून नागरिकांना पाच वर्ष वेळ देणारी उमेदवार आम्ही दिली आहे. तसेच नगर शहर वाढत असल्याने आता मोठ्या निधीची देखील आवश्यकता असल्याने निवडणुका झाल्यानंतर शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यात यावी अशी मागणी देखील आमदार संग्राम जगताप यांनी या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles