Friday, February 20, 2026

अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत ,पाणी पुरवठा विस्कळीत

अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागा सह उपनगरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाले बाबत

आज दि. 20/05/2025 रोजी अहिल्यानगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या विळद पंपीग स्टेशन येथील विज पुरवठा दुपारी चार वाजले पासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत तिन वेळा काही काळ खंडीत झालेला होता.

तदनंतर सायं. 7.40 वाजले पासून खंडीत झालेला विज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता.

दुपारी चार वाजले पासून सातत्याने खंडीत होत असलेल्या विज पुरवठ्या मुळे आज सायं. पाणी वाटप सुरू असलेल्या स्टेशन रोड परिसर, बालिकाश्रम रोड व काही उपनगर भागास पाणी पुरवठा करता आलेला नाही. या भागास उदया पाणी वाटप करण्यात येईल .

तसेच यामुळे बूधवार दि.21/05/2025 रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट , झेडीगेट ,सर्जेपुरा, रामचंद्र खुंट , दाळमंडई , जुने कलेक्टर ऑफिस परिसर , हातमपूरा, धरतीचौक , बंगाल चौकी , कोठी व तसेच गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी परिसर , सिव्हील हडको, प्रेमदान हडको , टी.व्ही . सेंटर परिसर , म्युसिपल हाडको इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार आहे. या भागास गुरुवार दि.22/05/2025 रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल .

त्याच प्रमाणे गुरुवार दि.22/05/2025 रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा म्हणजेच सिद्धार्थ नगर, दिल्लीगेट , नालेगांव, चितळे रोड , आनंदी बाजार , तोफखाना, जुने मनपा कार्यालय परिसर , पंचपीर चावडी , कापड बाजार खिस्त गल्ली , इ . भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास शुक्रवार दि.23/05/2025 रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल .

तरी सदय स्थितीत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याने व त्यामुळे शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन अहिल्यानगर महानगर पालिकेने केलेले आहे .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles