Wednesday, October 29, 2025

डॉ.बागुल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या ….तुमच्याकडे बघून माझ्यातला शिक्षक जागा झाला

डॉ.बागुल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या “तुमच्याकडे बघून माझ्यातला शिक्षक जागा झाला.”

राष्ट्रपती भवनात डॉ.बागुल यांना बॅज प्रदान

अहिल्यानगर-
राष्ट्रपतींची वाट पाहत हातात गुलाब घेऊन उभे असलेले देशभरातील निवडक शिक्षक,कलाकार..एवढ्यात राष्ट्रपतींच्या आगमनाने अमृत उद्यानामध्ये उत्साह संचारतो.. त्यांना अभिवादन करण्यासाठी उत्सुक असलेल्या शिक्षकांमध्ये डॉ.अमोल बागुल यांच्याजवळ जेव्हा राष्ट्रपती येतात तेव्हा बागुल त्यांना म्हणतात की “1994 ते 97 या कालावधीत आपण रायरंगपूरमध्ये शिक्षिका होतात आणि आज तर समस्त भारताच्या शिक्षिका झालेल्या आहात.”हे ऐकून राष्ट्रपती महोदया आनंदाने नमूद करतात की “तुमच्याकडे बघून माझ्यातला शिक्षक जागा झाला.” शुभेच्छा संदेश व आशीर्वाद देतात…असे चित्र होते राष्ट्रपती भवनाच्या वतीने आयोजित निमित्त शिक्षक ,कलाकार सन्मान उपक्रमाचे.भवनाच्या समाज माध्यमांवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या उपक्रमासाठी डॉ.बागुल यांची निवड होऊन विशेष निमंत्रण प्राप्त झाले होते.राष्ट्रपती भवनाच्या वतीने विशेष बॅज व प्रेरणादायी भेटवस्तू प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
“राष्ट्रपतींच्या या अमूल्य भेटीमुळे अजून ऊर्जा मिळाली असून भविष्यात विविध शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक उपक्रमांमधून भारतीय विद्यार्थी घडवण्याचे काम अजून वृद्धिंगत करणार आहे.”असे प्रतिपादन बागुल यांनी केले.येथील राष्ट्रीय अमृत उद्यान येथे संपन्न झालेल्या विविध गुणदर्शन सादरीकरण,राज्य वैशिष्ट्ये सादरीकरण, सांस्कृतिक सोहळा,शिक्षक कलाकृती सादरीकरण आदी उपक्रमांमध्ये डॉ बागुल यांनी सक्रिय सहभाग घेतला.आजपावेतो सुमारे नऊ वेळा डॉ.बागुल यांना राष्ट्रपतींची विशेष निमंत्रणे प्राप्त झालेली आहेत.
रायरंगपूर हे ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यामध्ये असलेले एक शहर आहे, जे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles