अहिल्यानगर अकोले तालुक्यातील शाळेतील मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी बुधवारी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरख कुशाबा लोहरे असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाने तीन मुलींना संगणक रूम साफसफाई करण्यासाठी नेले.त्यातील दोन मुलींना वर्गा बाहेर पाठवून दिले आणि एका मुलीसोबत अश्लील कृत्य करत लैंगिक छेडछाड केली. हा प्रकार संबंधित चिमुकलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या वडिलांनी गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष अशा प्रमुख व्यक्तींच्या कानावर ही बाब घातली. गावकरी व पालक यांनी संबंधित व्यक्तीस विचारणा केली. हे शिक्षक असे गैरकृत्य करत असत, यापूर्वी करत व धमकी देत, असे त्या मुलीने सांगितल्यावर पालकांच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांत संबंधित
मुख्याध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
शाळेत मुख्याध्यापकांनी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
- Advertisement -


