Sunday, February 22, 2026

Ahilyanagar….भूमीअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांसाठी 20 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी इसम रंगेहात

शेवगाव -बोधेगाव येथील जमिनीची नोंद फ ऐवजी अ मध्ये करण्यासाठी शेवगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांसाठी 20 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी इसमास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

किरण अशोक कांगणे असे लाच मागणाऱ्या उपअधीक्षकाचे नाव असून, देवेंद्र त्रिंबक फुंदे (रा.शेवगाव) असे कांगणे यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारणाऱ्या इसमाचे नाव आहे.

तक्रारदार यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जमिनीची नोंद फ ऐवजी अ मध्ये करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला होता. ही नोंद करण्यासाठी कांगणे यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजारांची लाच मागितल्याने तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार पथकाने शेवगाव येथे सापाळा लावून 20 हजारांची रक्कम स्वीकारताना फुंदे यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस हवालदार संदीप हांडगे, अंमलदार सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे या करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles