महात्मा ज्योतिबा फुले पुतळा माळीवाडा परिसरातील सुरु असलेल्या कुंटण खाना (वेश्या व्यवसाय) बंद करण्यात यावा यासाठी परिसरातील नागरिकांचा कोतवालीत मोर्चा
अहिल्यानगर – नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती व महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, माळीवाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु असून, परिसरातील नागरिकांना त्याामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर निवासी घरे असून महिला व मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा मागणीचे निवेदन शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर व श्री संत सावता महाराज उत्सव समिती यांच्या वतीने कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिले आहे . यावेळी परिसरातील असंख्य नागरिक ,महिला ,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
या ठिकाणी रोज अनोळखी पुरुषांची वर्दळ होत असून, रात्री उशिरापर्यंत असामाजिक प्रकार घडतात. यामुळे आमच्या परिसटातील स्त्रिया, मुली आणि नागरिक असुरक्षिततेच्या वातावरणात राहतात. सार्वजनिक शांती भंग होत असून, हा प्रकार भारतीय दंड संहिता कलम 370, 371, तसेच अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा, 1956 अंतर्गत गंभीर गुन्हा आहे.
तसेच रात्री 11 नंतर अल्पवयीन मुले हे बाबर बिल्डिंग खाली गांजा ओढत असतात, त्यामुळे परिसरातील नागरीकाना त्या मुलांचा त्रास सोसावा लागतो. रात्री बे रात्री ते गांजा व दारु पिल्यानंतर त्यांचे वैयक्तिक भांडण व मोठ-मोठयाने शिवीगाळ केल्याने जवळपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी आपण तात्काळ तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा प्रकारे कायमचा आळा घालावा, ही नम्र पण ठाम विनंती आहे
आपला
श्री विशाल गणेश मंदिर व श्री संत सावता महाराज उत्सव समिती
माळीवाडा ,अहिल्यानगर


