नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू ज्योतिषी अशोक खरातच्या बाबतीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशोक खरातच्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर विश्वस्त असल्यामुळे त्यांच्यावरही टीका होत आहे. भोंदू अशोक खरातविरुध्द एका महिलेने अत्याचाराची तक्रार केल्यानंतर त्याचे बिंग फुटले. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात दोन गट पडले असल्याचे दिसत आहे. एका गटाने चाकणकर यांची बाजू सावरून धरली आहे. तर रूपाली ठोंबरे पाटील आणि अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. मिटकरी यांनी या प्रकरणाचा संबंध थेट अजित पवारांच्या विमान अपघाताशी जोडला आहे
विधानपरिषदेचे आमदार आणि दिवंगत नेते अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या अमोल मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कॅप्टन अशोक खरातचा व्हीआरएस विमानाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. “अशोक खरातचे संबंध VSR पर्यंत असू शकतात तर विचार करा हा धागा कुठपर्यंत जाऊ शकतो?”, असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला होता.
यानंतर आता अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना आणखी गंभीर आरोप केले आहेत. मिटकरी म्हणाले, “व्हिएसआर विमानाच्या समोर बाबाचा एक फोटो दिसत आहे. याचा अर्थ तो त्या विमानाने प्रवास करत होता. या बाबाचे राजकीय लागेबंधे आहेत. तसेच तो अघोरी पूजा करून घेत होता. त्याचे मोठ मोठे भक्त असून त्याची माहिती समोर आली आहे. व्हिएसआरचे मालक व्हिके सिंहबरोबरही खरातचे गुरू शिष्याचे नाते होते का?.”
अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा; अमोल मिटकरींचा खरात प्रकरणावर गंभीर आरोप
- Advertisement -


