Friday, February 20, 2026

उत्कृष्ट कामकाजामुळे पतसंस्थेचा राज्यभरात नावलौकिक : चेअरमन सुनील नागरे

अहिल्यानगर जिल्हा ग्राम पंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या सन 2026 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

उत्कृष्ट कामकाजामुळे पतसंस्थेचा राज्यभरात नावलौकिक : सुनील नागरे

नगर : ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था ग्राम पंचायत अधिकाऱ्यांची कामधेनु असून संस्थेला 56 वर्षाची यशस्वी परंपरा आहे. एकच ध्यास सभासदांचा विकास या ध्येय धोरणानुसार सामाजिक उपक्रम म्हणून गेल्या 27 वर्षापासून पतसंस्थेमार्फत आपल्या सभासदांना मोफत दिनदर्शिका वाटप करण्यात येते. यंदाही सन 2026 या वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून ती सभासद, नागरिकांना मोफत वितरित करण्यात येत आहे. उत्कृष्ट कामकाजामुळे पतसंस्थेचा राज्यभरात नावलौकिक आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा ग्राम पंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील नागरे यांनी केले.

अहिल्यानगर जिल्हा ग्राम पंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थेच्या सन 2026 या वर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिर्डी येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव ए.श्रीकुमार, विश्वास काटकर, शशिकांत राय, राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, संजय म्हांळणकर, अशोक दगडे, प्रशांत जामोदे, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे विभागीय सचिव राजेंद्र पावसे, जिल्हाध्यक्ष युवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष गर्जे, व्हा. चेअरमन सुनील वाघ, मानद सचिव सविता भाकरे, संचालक सतिश मोटै, सुरेश मंडलिक, दिलीप नागरगोजे, शामराव भोसले, मंगेश पुंड, रूबाब पटेल, किसन भिंगारदे, उध्दव जाधोर, संदीप लगड, वाळू मुंढे, भगवान खेडकर, रामदास गोरे, नारायण खेडकर, अशोक खळेकर, भाऊसाहेब गायकवाड,राणी वाघ,तज्ज्ञ संचालक मधुकर जाधव, एकनाथ ढाकणे, लक्ष्मण नागरे, जालिंदर पाडेकर, बी.एम. गायकवाड, वंदना धनवटे, गणेश मुकणे, आसाराम कपिले, संस्थेचे व्यवस्थापक प्रदीप कल्याणकर, वरिष्ठ सहायक नफीसखान पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने 1 लाख रुपयाचा धनादेश महासंघाच्या अधिवेशनासाठी देण्यात आला.

जिल्हाध्यक्ष युवराज पाटील म्हणाले, परंपरेप्रमाणे यंदाही संस्थेने अतिशय सुंदर दिनदर्शिकेचे प्रकाशन केले असून सभासद तसेच नागरिकांनाही तिचे मोफत वितरण करण्यात येत आहे. भरभक्कम आर्थिक स्थिती असलेल्या संस्थेत सभासद व नागरिकांना मुदत ठेवींवर 10 टक्के व ज्येष्ठ नागरिक व विधवा माता – भगिनी साठी 10.50 टक्के व्याजदर दिला जातो. याचा नागरिकांनी तसेच सभासदांनी अवश्य लाभ घ्यावा. संस्थेमार्फत वर्षभर विविध उपक्रम, कार्यक्रम घेतले जातात. प्रत्येक कार्यक्रमाला सभासदांचे भक्कम पाठबळ मिळत असते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles