पुणे शहरातील ताडीवाला रोड परिसरात मांजर आणि पोपटाच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर तुफान मारामारीत झाले. या प्रकरणी मांजरीचा मालक दिनेश रंगराव पोताबत्तोनी याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अभिषेक सिंग हे ताडीवाला रोड परिसरात कुटुंबासह राहतात. त्यांनी आपल्या घरात एक पोपट पाळला असून त्याचा पिंजरा घरासमोर ठेवलेला असतो. त्यांच्या शेजारी राहणारे दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांनी मांजर पाळले आहे.
हे मांजर परिसरात मोकळेपणाने फिरत असल्याने ते अनेकदा सिंग यांच्या घरासमोर येऊन पोपटाच्या पिंजऱ्याजवळ फिरत असे. काही वेळा त्या मांजरीने पोपटाचा पिंजरा ढकलल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे सिंग यांना याचा त्रास होत होता. त्यांनी याबाबत शेजारी दिनेश पोताबत्तोनी यांना मांजरीवर लक्ष ठेवण्याची विनंती केली होती. मात्र याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होता.
घटनेच्या दिवशीही मांजरीने पुन्हा एकदा पोपटाचा पिंजरा पाडल्याने दोघांमध्ये वाद झाला. पिंजरा पडल्यामुळे संतापलेल्या अभिषेक सिंग यांनी दिनेश पोताबत्तोनी यांना मांजरीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. मात्र ही बाब दिनेश यांना न पटल्याने दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झालज


