काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांना लाखोंची लाच घेताना पकडण्यात आले. तसेच परभणीत एका पोलीस कर्मचाऱ्याला हजारोंची लाच घेताना रंगे हाथ पकडण्यात आलं. या सलग घडलेल्या घटनांनंतर पुन्हा एकदा राज्यातील पोलीस दलात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मधील एका पोलीस अधिकाऱ्याने २ लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या विरोधात एका व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर (रा. वानवडी) करत होते.
मात्र तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने तीन फेब्रुवारी रोजी ‘एसीबी’कडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्ररीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला.
पडताळणीदरम्यान खेडकर यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी मिळून तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले असून आता याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दलात सतत होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे खळबळ उडाली आहे.
पुण्यात बड्या अधिकाऱ्याने घेतली २ लाखांची लाच; पोलीस दलात खळबळ
- Advertisement -


