शिर्डी,चाळीस वर्षे जनता भोजापूर धरणाच्या पाण्याची वाट बघत होते. भोजापूरच्या लाभक्षेत्रातील गावे वगळावेत यासाठी बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिले होते.. मात्र त्यांना जाब विचारण्याऐवजी तुम्ही आजपर्यंत त्यांनाच निवडून देत होता. पण खऱ्या अर्थाने ४० वर्षानंतर दुष्काळी गावांमध्ये पाणी पोहचले असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. चाळीस वर्षे जनता भोजापूर धरणाच्या पाण्याची वाट बघत होते. भोजापूरच्या लाभक्षेत्रातील गावे वगळावेत यासाठी बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिले होते.. मात्र त्यांना जाब विचारण्याऐवजी तुम्ही आजपर्यंत त्यांनाच निवडून देत होता. पण खऱ्या अर्थाने ४० वर्षानंतर दुष्काळी गावांमध्ये पाणी पोहचले असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. अमोल खताळ यांच्या रूपाने झालेले रूपांतर संगमनेर तालुक्याला विकासाची नवी दिशा देणारे ठरणार आहे. चाळीस वर्षे जनता भोजापूर धरणाच्या पाण्याची वाट बघत होते. भोजापूरच्या लाभक्षेत्रातील गावे वगळावेत यासाठी बाळासाहेब थोरात यांनी पत्र दिले होते.. मात्र जाब विचारण्याऐवजी तुम्ही आजपर्यंत त्यांनाच निवडून देत होता. आम्ही लाभक्षेत्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. पाणी आम्हीच आणले आणि कॅनॉल आम्हीच पूर्ण करणार.
पूर्वी केवळ क्रेशर व वाळूवाले फिरायचे
जलसंपदा खाते माझ्याकडेच असल्याने तुम्ही चिंता करू नका, कारण मी जे बोलतो ते करतो. अमोल खताळ नवीन आमदार असल्याने त्याच्यावर सातत्याने टीका होत आहे. त्यांनी ४० वर्षे काही केले नाही, आता अमोलला तरी काम करू द्या. संगमनेर मतदार संघातील लोकांना पूर्वी आमदार बघायला मिळत नव्हते. आता अमोल खताळ गावोगावी फिरत आहे, लोकांना भेटताय. पूर्वी संगमनेरमध्ये फक्त क्रेशर वाले आणि वाळू वाले फिरायचे. ठेकेदारांनी गावं वाटून घेतली होती. त्यामुळे आपण आता लोकांमध्ये राहणारा आमदार दिला.


