Thursday, February 19, 2026

विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कुठे आणि का झाली?व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा रायगडमधील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण गावी गेलो असता त्या ठिकाणी दोन शेतकरी भांडत होते, त्यांना भांडू नका असं सांगायला गेलो असता त्यावेळी कुणीतरी शूट केलं असावं असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं. अलिबागमध्ये जमीन मालकाच्या मर्जीविरोधात मोजणी करण्याचा प्रयत्न झाला असता त्यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. त्यावर राहुल नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलं.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यावरुन अनेक प्रतिक्रिया आल्या. अलिबागमध्ये एका जमीन मालकाच्या मर्जीविरुद्ध, तो बाहेरगावी गेला असताना त्याच्या जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित जमीन मालकाने आणि त्याच्या पत्नीने त्याला विरोध करत गोंधळ घातला. झालेल्या प्रकारानंतर राहुल नार्वेकरांना तिथून पाय काढता घ्यावा लागला होता.

संबंधित घटना ही अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील असल्याची माहिती आहे. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी गावी गेलो होतो. त्यावेळी रस्त्यावर दोन शेतकरी आपापासात भांडत होते. मी त्यांना भांडू नका असं सांगत होतो, त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेलो. त्यावेळी कुणीतरी शूट केलं आणि आता ते सोशल मिडियावर टाकलं.
https://x.com/rautsanjay61/status/2022578980961104022?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2022578980961104022%7Ctwgr%5Ef891a32e30b86224f17d11b0f336761d2ca4c5ed%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmumbai%2Frahul-narvekar-viral-video-raigad-alibag-mhatroli-land-news-sanjay-raut-tweet-marathi-news-1412722

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये राहुल नार्वेकर आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत आणि एक दाम्पत्य त्यांना विरोध करताना दिसत आहे. आपण बाहेरगावी साखरपुड्यासाठी गेलो असता तुम्ही आमच्या घरी कसं काय शिरला? असा प्रश्न हे दाम्पत्य नार्वेकरांच्या सहकाऱ्यांना विचारताना दिसतंय. आम्ही बाहेरगावी गेलो असताना तुम्ही आमच्या जमिनीची मोजणी कशी करता असं विचारत ते दाम्पत्य आक्रमक झाल्याचं दिसून येतंय.

यावेळी राहुल नार्वेकर संबंधित दाम्पत्याला शांत बसण्याची सूचना करताना दिसत आहे. तुम्ही भांडू नका असं सांगताना दिसत आहे. मात्र या दाम्पत्याने नार्वेकरांच्या सहकाऱ्याला पकडून त्याला मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील एका जमीन मोजणीच्या मुद्द्यावरून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles