राहुरी विधानसभा पोटनिवडणुक; भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी केले आवाहन

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले ६ एप्रिलला अर्ज दाखल करणार; शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहणार उपस्थित; पांडुरंग लॉन्सवर भव्य विजय सभा

उमेदवारी अर्ज भरण्याची सभा हीच विजयाची सभा – अक्षय कर्डिले

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप पक्षाच्या वतीने उमेदवार अक्षय कर्डिले हे दिनांक ६ एप्रिल रोजी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज भरला जाणार असून निवडणुकीचा माहोल रंगण्यास सुरुवात झाली आहे.
स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असून कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे भव्य विजय सभेचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उमेदवार अक्षय कर्डिले यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर बुऱ्हानगर येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाती सूळ, बाजीराव गवारे, अशोक झरेकर, संदीप कर्डिले, देविदास कर्डिले, अरुण होळकर, दादाभाऊ चितळकर, शीलाताई खराडे, प्रयागा लोंढे, आनंदराव शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले की, माझे वडील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी जनतेशी असलेले नाते कधीही तुटू दिले नाही. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि सुखदुःखात सहभागी होत विकासाची कामे केली. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले.
त्यांचा हा विकासाचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या वडिलांसोबत काम केले आहे, त्यामुळे मला सांभाळून घ्या आणि जनतेची सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles