राहुरी पोट निवडणुकीत एम आय एम उमेदवारी देण्याचे तयारीत
जनतेला जातीवादी मुक्त पर्याय देणार – डॉ परवेज अशरफी
नगर – 2014 पासून कोणतेही ठोस काम न करू शकणारे सरकार म्हणजेच भाजप सरकार भारत देशात प्रत्यक ठिकाणी फक्त जातीवाद आणि जातीय तेढ निर्माण करून मुस्लिम आपलसंख्यक समाजाला वेठीस धरण्याचा काम सर्रास चालू आहे.
छोटासा गाव असो की मोठा शहर या सरकारचे आशीर्वादाने जातीवादी संघटन सक्रीय झाले असून त्यांचा एकच धंदा म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला त्रास देणे, त्यांचे मशिदीवर दर्ग्यावर हल्ले करणे, मुस्लिम समाजाच्या जागांवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणे, मुस्लिम मुलींना फूस लाऊन पळून नेणे, त्यासाठी लोक प्रतिनिधीने खुलेआम मदत करणे,असे अनेक मुद्दे या सरकारचे महत्त्वाचे मुद्दे बनले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात ही असे अनेक विषय सरकारच्या आशीर्वादाने चालू असून सामान्य जनता हिंदू मुस्लिम आणि जातीवादला वैतागली असून जनतेला जातीवादी मुक्त लोक प्रतिनिधी असावा अशी इच्छा आहे.
महाराष्ट्रात बारामती आणि राहुरी मतदार संघात पोट निवडणूक होणार असून राहुरी मतदार संघाची चाचपणी करण्यात येत आहे अशी माहिती एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी दिली.
डॉ अशरफी पुढे म्हणाले की नगरची जनता या जातीवादी प्रवृत्तीला वैतागली असून जनतेला त्यांच्यातून एक सामान्य चेहरा राहुरी मतदार संघातून निवडून आणायचे आहे. ज्याप्रकारे सर्व सत्ताधारी पक्ष विकासाचा अजेंडा सोडून फक्त जातीय तेढ निर्माण करत आहे. त्यावरून सत्ताधारी पक्षाची मानसिकता ही जातीवादी आणि समाज द्वेषी असल्याचे दिसते. विशेष बाब म्हणजे ज्या महाविकास आघाडीला जनतेने भरभरून मतदान केले त्या आघाडीने हे सर्व घडत असताना मौन धारण केले असल्याचे चित्र आहे. प्रतिक्रिया न देणे हा या महाविकास आघाडीचा मुख्य अजेंडा झालेला आहे.
सत्ताधारी असो की विरोधी पक्ष यांनी सामान्य जनतेचे अपेक्षा भंग केले असल्याने एम आय एम ला पर्याय म्हणून पूर्ण राज्यची नजर आहे.
प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाने राहुरी मतदार संघाची चाचपणी करून अहवाल देणार असल्याचे तसेच इच्छुक उमेदवार हे इम्तियाज जलील यांच्याशी लवकरच भेट घेणार असल्याचे डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.
एम आय एम ने राहुरी मतदार संघात आपले उमेदवार दिल्याने बिनविरोध निवडणूक शक्य होणार नसून पूर्ण समीकरण बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे. नगर पालिका आणि महानगर पालिका निवडणुकी नंतर एम आय एम पक्षाला जनतेतून विशेषता सर्व धर्माच्या लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.


