अहिल्यानगर : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.
प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीबाबत बोलताना म्हटलं की मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचे कार्य कुणी डावलू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केले पाहिजे, असे वक्तव्य माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपूरे यांनी केलं आहे. पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू असे सांगताना तनपुरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने, प्राजक्त तनपूरे यांच्या मनात नेमकं काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं प्राजक्त तनपूरे यांनी म्हटलंय. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.. तर अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आपणच प्रबळ दावेदार असल्याचं अधोरेखित केले आहे.पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो, कारण एक एक आमदार महत्वाचा असतो. ज्याला जनतेचे समर्थन असेल त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील अशी स्पष्ट भूमिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी मांडली आहे.


