अहिल्यानगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ; 9 जुगारी पोलिसांच्या ताब्यात : मुद्देमाल जप्त

अहिलयानगर – पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथे भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या . तिरट जुगाराचे क्लबवर छापा टाकत 9 आरोपीकडून 1,59,200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे.सदर आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अधिकारी पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, ऱ्हदय घोडके, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक नेमुन अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.

दिनांक 28 जुलै 2025 रोजी नेमण्यात आलेले पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना पथकास माहिती मिळाली की विजय जाधव हा तपनेश्वर गल्ली, जामखेड या ठिकाणी तिरट नावाचा पत्त्यांवर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवित आहे . पथकाने तपनेश्वर गल्ली, जामखेड या ठिकाणी जावुन छापा टाकला. भिंतीचे आडोशाला तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत खेळणाऱ्या 1) नितीन आश्रुबा रोखडे वय 50 वर्षे, रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड, 2) जावेद इस्माईल बागवान वय 44 वर्षे, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड, 3) संतोष नवनाथ कदम वय 42 वर्षे, रा. कुसडगांव ता. जामखेड, 4) नवनाथ सदाशिव जाधव वय 36 वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, 5) विजय विनायक कळसकर वय 53 वर्षे, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड, 6) निलेश लक्ष्मण पेचे वय 40 वर्षे, रा. पोकळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड, 7) जयसिंग विश्वनाथ ढोके वय 40 वर्षे, रा. भुतवडा, ता. जामखेड, 8) विठ्ठल मोहन भोसले वय 38 वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, ता. जामखेड, 9) विजय गहिनीनाथ जाधव वय 53 वर्षे, रा. कर्जत रोड, जामखेड यांना ताब्यात घेतले.

पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी हे तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आल्याने त्यांची अंगझडती घेऊन त्यांचे ताब्यातुन एकुण 1,59,200 रूपये किंमतीचे. त्यात रोख रक्कम, 8 मोबाईल फोन, 1 मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ताब्यातील आरोपीविरूध्द जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं.427/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles