Sunday, February 22, 2026

Ahilyanagar crime :दोन लॉजवर छापा; दोन तरुणांसह 4 महिला ताब्यात

शिर्डी शहरात मंगळवारी सायंकाळी दोन लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणार्‍या दोन हॉटेल मालक तसेच दोन मॅनेजर यांच्यावर पिटा अंतर्गत कारवाई करत दोन तरुणांसह 4 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई केली आहे. शिर्डीतील अवैध गुन्हेगारी व वेश्या व्यवसाय मोडून समूह उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी शिर्डी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या हॉटेल सावता व हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस वर वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुप्त खबरीने शिर्डी पोलिसांना दिली. त्यानंतर 3 मे रोजी सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एकाच वेळी दोन हॉटेलवर छापा मारला.

त्या ठिकाणी असलेल्या चार महिला व दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात दोन्ही हॉटेल मालक व मॅनेजर असे एकूण चार व्यक्तींवर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शिर्डी शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देह व्यापार चालत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांकडे केलेल्या होत्या.त्या तक्रारींच्या अनुषंगाने यापूर्वी देखील शिर्डी पोलिसांनी विविध लॉजवर छापे टाकून गुन्हे दाखल केले होते. यापूर्वी देखील गुन्हे दाखल असलेल्या देह व्यापार करणार्‍या महिला या दोन्ही लॉज मिळून होत्या. त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हॉटेल लॉजवर हे प्रकार सुरू होते त्या हॉटेल मालकावर देखील गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांच्या कारवाईची खबर लागताच शिर्डी शहरात ज्या हॉटेलवर अशा प्रकारचे व्यवसाय चालतात त्या हॉटेल लॉजधारकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली. देह व्यापार करणार्‍या या महिलांना काही गुंड प्रवृत्तीचे तरुण आर्थिक फायद्यासाठी पाठबळ देत असल्याचे देखील पुढे आले आहे. अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील पोलिसांकडून वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी सांगितले. शिर्डी शहरात बसस्थानक, नगर-मनमाड रोड, पिंपळवाडी रोड या ठिकाणी या महिला रोडवर उभे राहून अश्लिल हावभाव करत असल्याच्या स्थानिक ग्रामस्थ व साईभक्तांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी ही मोहीम राबवली. शिर्डीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध व्यवसाय मोडीत काढण्या करिता पोलिसांनी सातत्याने कारवाईची मोहीम सुरूच ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles