Thursday, February 19, 2026

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी ४११६ पदांसाठी भरती सुरु ; पात्रता

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. रेल्वेत सध्या भरती निघाली आहे. उत्तर रेल्वेने ट्रेड अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ४११६ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २५ नोव्हेंबर म्हणजे कालपासून सुरु झाली आहे.

रेल्वेतील या नोकरीसाठी तुम्ही rrcnr.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२५ आहे. उत्तर रेल्वेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. तुमच्या शैक्षणि पात्रतेनुसार तुमची नियुक्ती होणार आहे.त्यामुळे ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. रेल्वेतील या नोकरीमुळे तुम्हाला अनुभव मिळणार आहे. अनुभवाच्या पात्रतेनुसार तुम्हाला इतर ठिकाणी नोकरी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर ही संधी चुकवू नका.

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत उमेदवारांकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?

रेल्वेतील या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही rrcnr.org या वेबसाइटवर जावे.

यानंतर होमपेजवरील संबंधित लिंकवर क्लिक करा.

यानंतर अर्जात सर्व माहिती भरा. यानंतर फी भरा.

यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून सबमिट करावा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles