बीडसह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. परळी तालुक्यातील पोहनेर गावाला पाण्याने वेढा घातला आहे. अशातच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी होडीतून प्रवास करत गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परळी तालुक्यातील पोहनेर गावाला पाण्याने वेडा घातला आहे यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी होडीमध्ये बसून गावकऱ्यांशी संवाद साधला, सरकार तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका प्रशासनाला मी आदेश दिले आहेत, असा धीर धनंजय मुंडे यांनी गावकऱ्यांना दिला.यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, ‘पोहनेर हे फार मोठं गाव आहे. या सगळ्या गावांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीवितहानी सारखी कुठलीही घटना नाही. पण लाईट नाहीये, खायला काही नाहीये.’पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आता शेतकऱ्यांची परिस्थिती खूप अवघड झाली आहे, कारण कुठलंच पीक त्यांच्या हाती लागलेले नाही. या भागामध्ये ऊस आहे. मात्र पूर्ण ऊस पाण्याखाली गेला आहे. सांगली साताऱ्याला जशी ऊसाला मदत दिली जाते, त्याच पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांना मदत द्यावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे.अनेक घरे, दुकाने पाण्याखाली गेली आहेत. या सर्वांना योग्य ती मदत दिली गेली पाहिजे. ज्यावेळी निसर्ग कोपतो त्यावेळी सर्वात अगोदर बळी शेतकऱ्याचा जातो. मी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे


