Tuesday, March 3, 2026

केंद्रीय हिंदी निदेशालय आयोजित देश पातळीवरील प्रशिक्षणासाठी राजेंद्र निमसे यांची निवड

केंद्रीय हिंदी निदेशालय आयोजित देश पातळीवरील प्रशिक्षणासाठी राजेंद्र निमसे यांची निवड

अहिल्यानगर : केंद्रीय हिंदी निदेशालय व शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली आयोजित हिंदीतर भाषा क्षेत्रातील नवलेखकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजित केलेल्या देश पातळीवरील प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी आळे, तालुका-राहुरी येथील प्राथमिक शिक्षक राजेंद्र निमसे यांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे .

केंद्रीय हिंदी निदेशालयाचे सहाय्यक निदेशक नत्थूलाल यांच्या १डिसेंबर २०२५ च्या निवड पत्रांन्वये हे प्रशिक्षण १५ ते २२ डिसेंबर पर्यंत काझी नजरूल इस्लाम महाविद्यालय, चिरुलिया,आसनसोल,पश्चिम बंगाल येथे संपन्न होणार असून या प्रशिक्षणास येण्या जाण्यासाठी रेल्वेच्या वातानुकूलित तीन टीयर मोफत भाडे, नियमानुसार प्रतिदिन दैनिक शंभर रुपये भत्ता व मानधन स्वरूपात प्रतिदिन पन्नास रुपये इतकी रक्कम दिली जाणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे .

यापूर्वी श्री निमसे यांनी सी सी आर टी ,नवी दिल्ली आयोजित चार देशपातळीवरील प्रशिक्षण व एनसीईआरटी आयोजित एका प्रशिक्षणामध्ये आजपावेतो यशस्वीपणे सहभाग नोंदविलेला आहे .

केंद्रीय हिंदी निदेशालय ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयान्तर्गत असलेल्या या प्रमुख संस्थेची स्थापना १९६० मध्ये झाली असून तिचा मुख्य उद्देश हिंदी भाषा विकास, प्रसार आणि अखिल भारतीय व जागतिक स्तरावर हिंदीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे, हा आहे .या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून चेन्नई ,हैदराबाद, कलकत्ता व गुवाहाटी येथे क्षेत्रिय कार्यालय आहेत . भारतीय संविधानाच्या कलम ३५१ मध्ये हिंदी भाषेच्या विकासाच्या निर्देशांचे पालन करून भारताच्या सामाजिक संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून आणि संस्कृत व इतर भाषेमधील शब्दांचे ग्रहण करून तिला समृद्ध करण्याचे निश्चित करण्यात आले आहे .

श्री निमसे यांची या प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल राहुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे, शिक्षण विस्तार अधिकारी इंदुमती देवरे, केंद्रप्रमुख विद्या भागवत,राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन रामदास बाचकर,सरपंच सौ आस्मा शौकत शेख ,उपसरपंच ताराबाई मधे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर पारधे यांनी अभिनंदन केले आहे .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles