Saturday, February 21, 2026

नगर शहरात खळबळ….. माजी महापौर अभिषेक कळमकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. शाळेत नोकरीला लावून देतो, असे अमिष दाखवून, वारंवार अत्याचार केल्याचे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे.

पीडित युवतीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. अभिषेक कळमकर हा पसार झालेला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याविरोधात अभिषेक कळमकर याने शरद पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. हा गुन्हा दाखल झाल्याने अहिल्यानगरमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. पीडित युवती ही शिरूर तालुक्यातील असून, एमआयडीसी पोलिसांकडे तिने आज पहाटे येऊन तक्रार दिली. पीडित युवतीने फिर्यादीत म्हटले आहे की, तीन महिन्यापूर्वी नोकरीच्या शोधात अहिल्यानगरमध्ये आले. तिथं अभिषेक कळमकर याच्या सोशल मीडियावरून संपर्क क्रमांक मिळवत संपर्क केला. परिस्थिती सांगून, नोकरीची गरज असल्याचे सांगितले. दोन-तीन दिवसांनी कुष्ठधाम रोडवर इथं भेटायला मिळवले. तिथं कागदपत्र घेत, एमआयडीसीत माझी शाळा आहे, तिथं कामाला लावून देतो, असे सांगितले. ही शाळा बघण्यासाठी बोलवल्यानंतर, तिथं पीडित युवती आला. या वेळी पीडित युवतीला केडगाव बायपासला उतरवले. अभिषेक कळमकर हा तिथं अलिशान वाहनातून येऊन, मला घेऊन विळद घाट इथं गेला. गाडीत आम्ही दोघे होतो. तिथं गाडी हायवे लगत थांबवून थंडपेय दिले. थंड पेय पिल्यानंतर गुंगी आली. त्यावेळी कळमकर हा आपल्याला स्पर्श करत होता. तिथं वाहनात माझे कपडे काढून जबरदस्ती केल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर आपण खूप घाबरलो होतो. झालेला प्रकार कोणालाच सांगितला नाही. त्यानंतर दोन दिवसांनी अभिषेक कळमकर याने व्हाॅट्सअपवर व्हिडिओ काॅल करून, कपडे काढण्यास सांगितले. विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून व्हिडिओ काॅलचे स्क्रिने रेकाॅर्डिंग केल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे.

यानंतर अभिषेक कळमकर याने 18 फेब्रुवारीला कागदपत्र घेऊन शिरूर इथल्या मारवेल हाॅटेलवर बोलावलं. नोकरीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून कळमकर याने एका व्यक्तिसोबत हाॅटेलमधील रूम नंबर 110 मध्ये पाटवले. तो व्यक्ती तिथून गेल्यावर अभिषेक कळमकर तिथे आला अन् माझ्याबरोबर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या प्रकाराचे व्हिडिओ देखील काढले. या शरीर संबंधाच्या कोणाला सांगितल्यास, मला आणि माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी पोलिसांनी कळमकर याच्या शोधात तपास सुरू केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles