रोहित पवार मनाने भाजपमध्येच, फक्त शरीराने शरद पवारांसोबत आहेत..

भाजपाचे युवा नेते मंत्री नितेश राणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्याबाबत मोठ विधान केलं आहे. होय रोहित पवार 2019 लाच भाजपात येणार होते, असा मोठा गौप्यस्फोट करून राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय खळबळ उडवून दिली आहे. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदराच्या विकास कामांच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी ते रत्नागिरी दौऱ्यावर आले होते.

अजितदादांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी रोहित पवार भाजपमध्ये येणार या केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी वरील प्रतिक्रिया देताना सांगितलं की, होय यामध्ये आश्चर्य काय असा सवाल करत ते म्हणाले की 2019 मध्येच ते येणार होते असा पुनरुच्चार करत ते कुठल्या कुठल्या भाजपच्या नेत्यांना कधी कधी भेटतात हे जर का मी सांगितलं आता आम्ही हे बोलायला लागलो ना तर त्यांना तोंड वाचवायलाही जागा राहणार नाही. ते मनाने भाजपचे आहेत फक्त शरीराने ते शरद पवार साहेबांबरोबर आहेत, असं खळबळजनक वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केल आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles