जिल्हा परिषद शाळेत शिक्षक भरती
८००० पदांसाठी होणार भरती
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका संपताच सुरु होणार प्रक्रिया
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची भरती केली जाणार आहे. सध्या शाळांमध्ये सुमारे १५ हजार १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ८० टक्के रिक्त पदे भरती केली जाणार आहे. शाळांमध्ये ८ हजार पदांसाठी भरतीचे नियोजन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची भरती केली जाणार आबे. फेब्रुवारी- मार्चपासून शिक्षक भरतीला सुरुवात होणार आहे.
सध्या २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षाची संतमान्यता अंतिम टप्प्यात आहे. यानंतर शासन निर्णयानुसार पटसंख्येअभावी अतिरिक्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही यासंदर्भात प्रश्न विचारले होते. याच पार्श्वभूमीवर आता शिक्षक भरती केली जाणार आहे.
जिल्हानिहाय रिक्त पदांची माहिती मिळवली जाणार आहे. आता टीईटी परीक्षेचा निकालदेखील लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका संपल्यावर रिक्त जागांवर भरतीसंबंधित जाहिराती काढल्या जातील. पवित्र पोर्टलवरुन ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असं सूत्रांनी सांगितले आहे.
राज्यात एकूण ६३००० जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. या शाळेत एकूण १.९८ लाख शिक्षक शिकवतात. त्यातील १५,१५८ पदे रिक्त आहेत. यातील ८० टक्के म्हणजेच ८००० पदांसाठी भरतीचे नियोजन केले जाणार आहे.


