केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहे. यामध्ये काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते तर काही योजनांमध्ये पीकविमा मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळते. दरम्यान, पंतप्रधान पीकविमा योजनेला ( मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अजून वेळ मिळणार आहे. आता शेतकरी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पंतप्रधान पीकविमा सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना १४ ऑगस्ट आणि कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चालू खरीप हंगामासाठी ही योजना राबवली जात आहे. तांत्रिक अडचणींमुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार ही विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी pmfby.gov.in पोर्टलवर, बँक किंवा विमा प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स अॅप अथवा सीएससीमार्फत नोंदणी करावी, असं सरकारने सांगितलं आहे.


