Saturday, February 21, 2026

केडगाव परिसराचा विद्युत पुरवठा सात दिवसात सुरळीत करा अन्यथा आंदोलन

केडगाव उपनगरात विजेचा लपंडाव ; नागरिक त्रस्त

केडगाव परिसराचा विद्युत पुरवठा सात दिवसात सुरळीत करा अन्यथा आंदोलन : माजी सभापती मनोज कोतकर

अहिल्यानगर : केडगाव उपनगराचा गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशा त्रस्त झाले आहे. विद्युत विभागाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री-अपरात्री लाईट जात असल्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू असून विद्युत विभागाने अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडणे गरजेच्या होत्या, मात्र कुठल्याही उपयोजना झालेल्या दिसत नाही. लाईट संदर्भात कुठलीही पूर्वसूचना न देता
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये विद्युत विभागाच्या विरोधात संतापाची लाट असून, येत्या आठ दिवसात केडगाव उपनगराचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा सहाय्यक अभियंता राहुल शिलावत यांना निवेदनाद्वारे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला.

यावेळी मनोज कोतकर निवेदनात पुढे म्हणाले की, केडगाव उपनगरामध्ये नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आली आहे. मात्र विद्युत विभागाच्या ट्रांसफार्मरची संख्या कमी आहे. दोन पोल मधील अंतर जास्त असल्यामुळे तारा अक्षरशा लोम्बकाळात आहे. त्यामुळे देखील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच या परिसरामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने राहत असल्यामुळे त्यांची विजेवरची उपकरणे चालत नसल्यामुळे त्यांचे देखील हाल होत आहे. तसेच व्यसाय करणाऱ्या नागरिकांची लाईट अभावी मोठे आर्थिक नुकसान होत आहे. विद्युत विभागाचा दूरध्वनी क्रमांक कायमस्वरूपी बंद असतो, त्यामुळे नागरिकांनी तक्रार कुठे करायची तसेच कर्मचारी अपुरे असल्यामुळे झालेला प्रॉब्लेम तातडीने सोडवता येत नाही. त्यामुळे केडगावकरांना अक्षरशः एक-एक दोन-दोन दिवस अंधारात काढावी लागतात, विद्युत विभागाकडे केडगावच्या वीज प्रश्न संदर्भात वारंवार लेखी निवेदने दिले आहे. तीव्र स्वरूपाचे आंदोलने देखील केले आहे. मात्र प्रश्न सुटला जात नाही दौंड रस्ता, सोनेवाडी रस्ता, पुणे महामार्ग, लिंक रोड, लोंढे मळा, केडगाव देवी रस्ता विजे अभावी अक्षरशा अंधारात असतात. तरी विद्युत विभागाने येथे आठ दिवसात केडगाव उपनगराचा विजेचा प्रश्न न सोडविल्यास कुठलीही पूर्व सूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. असा इशारा महानगरपालिकेचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles