Rinku Rajguru अभिनेत्री रिंकु राजगुरूचा ‘आशा’ हा सिनेमा नुकता रिलीज झाला आहे. या सिनेमाला महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिंकूने या सिनेमात आशा सेविकांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या निमित्तानं रिंकूचा एक वेगळा अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
काही दिवसांआधी रिंकूने एक डान्स व्हिडीओ शेअर केला होत. या व्हिडिओला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली होती.
त्यानंतर आता रिंकूने पुन्हा एकदा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी रिंकू थेट लावणीवर थिरकली आहे. लावणी किंग आशिष पाटीलबरोबर तिचा लावणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
रिंकूला लावणीवर डान्स करताना तिच्या चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. रिंकूची एक वेगळी साइड यातून पाहायला मिळाली. ‘राजसा जवळी जरा बसा’ या लावणीवर रिंकूनं डान्स केला आहे. पुन्हा एकदा रिंकूची अदाकारी यात पाहायला मिळाली.
“आपल्या पिढ्यांचा वारसा असणारी लावणी. लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा छोटा प्रयत्न केला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करताना मला आनंद वाटत आहे”, असं कॅप्शन देत रिंकूने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
रिंकूने आशिष पाटीलचेही आभार मानलेत. तिनं लिहिलंय, “माझ्या बालपणीच्या आठवणी पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी, मला हे करण्याची प्रेरणा दिल्याबद्दल आशिष पाटील तुझे मनापासून आभार”. रिंकूने पुढे लिहिलंय, “कोणतीही मोठी तयारी नाही, फक्त जिद्द आणि आवड. अवघ्या 2 तासांची प्रॅक्टिस आणि शूट”


