रिंकू सिंह आणि प्रिया सरोजच्या या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर येत आहे. यावेळी प्रिया सरोज यांनी डान्स देखील केला.टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू खेळाडू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा काल (8 जून) साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली. साखरपुड्याची अंगठी घालताच प्रिया सरोज भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, रिंकू आणि प्रिया सरोजच्या या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर येत आहे. यावेळी प्रिया सरोज यांनी डान्स देखील केला. मात्र होणाऱ्या पत्नीला नाचताना रिंकू सिंह पाहतच बसला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव, डिंपल यादव, शिवपाल यादव, राजीव शुक्ला, जया बच्चन, क्रिकेटपटू प्रवीण कुमार, पियूष चावला यांच्यासह इतर उपस्थित होते. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांनी साखरपुड्यापूर्वी कुटुंबासह बुलंदशहरच्या चौधेरा येथील विचित्र देवी मंदिरात आशीर्वाद घेतला. त्यांनतर फुलकर्न हॉलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा विवाह सोहळा 18 नोव्हेंबरला वाराणसीमध्ये होणार आहे. प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले असून सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिली केली. त्यानंतर, त्यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारण एंट्री केली आहे. गत 2024 मध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीपी सरोज ह्या दिग्गज राजकीय नेत्याचा पराभव करुन विजय मिळवला. वडिलानंतर आता त्यांची कन्या प्रिया सरोज येथील मतदारसंघातून लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. ज्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेत. दरम्यान, प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज देखील मछली शहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तुफानी सरोज 1999, 2004, 2009 मध्ये खासदार होते.