शेतात जाण्यासाठी तहसीलदार शिंदे यांच्या मध्यस्थीतून रस्ता खुला.
शेतकऱ्यांनी आपापसातले वाद मिटून शेतात जाण्याचे रस्ते खुले करावे- संजय शिंदे.
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी मध्ये अनेक वर्षापासून ७ ते ८ शेतकऱ्यांचा जाण्या येण्याचा रस्ता बंद असून शेतकऱ्यांना शेतीमध्ये मशागतीसाठी दळवण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने जमीन पडीक होती या समस्याची दखल सामाजिक कार्यकर्ते गोरख आढाव यांनी घेऊन अहिल्यानगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून सोडवण्यात आली. तहसीलदार शिंदे हे स्वतः येऊन रस्ता खुला केला व शेतकऱ्यांचे आपसातले वाद मिटवण्यात आले व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही तसेच इतर ठिकाणी ज्या ज्या शेतात जाण्यासाठी रस्ते नाही त्या शेतकऱ्यांनी या गोष्टीचा अवलंब करून बंद केलेले रस्ते तसेच आपापसातली वाद मिटून रस्ते खुले करावे असे आवाहन अहिल्यानगरचे तहसीलदार संजय शिंदे यांनी केले व यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरख आढाव म्हणाले की, अशाच प्रकारे पिंपळगाव माळवी मधील शेतकऱ्यांचा बोध इतरही शेतकऱ्यांनी घेऊन तसेच पंचक्रोशीतील गावातील शेतकऱ्यांनी घ्यावा व आपल्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना अडचण येणार नाही याची देखील दखल घेऊन रस्ते खुले करण्याचे आव्हान करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार संजय शिंदे यांचा सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते गोरख आढाव, सुहास लांडगे, किरण बाबर, गणेश आढाव, अरुण बाबर, सोमनाथ आढाव, रावसाहेब आढाव, महादेव आढाव, रावसाहेब सोनार, देवराम शिंदे, महादेव भोसले, गणेश आढाव, प्रकाश बाबर आदी शेतकरी उपस्थित होते.
नगर तालुक्यात शेतात जाण्यासाठी तहसीलदार शिंदे यांच्या मध्यस्थीतून रस्ता खुला
- Advertisement -


