रोहित पवारांना धक्का कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा गट नेता बदलण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली
अहिल्यानगर २६ कर्जत नगरपंचायतीमधील रोहित पवार गटाच्या कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी रोहित पवार गटांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली होती व त्यामध्ये अमृत काळ दाते यांना गटनेता म्हणून नोंदविण्यात बाबत विनंती करण्यात आली होती जिल्हाधिकारी यांचे समोर झालेल्या सुनावणीअंती गटनेता बदलाबाबत रोहित पवार गटाची असणारी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावून कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून संतोष मेहत्रे व उपनेते म्हणून सतीश पाटील यांची असणारे नेमणूक कायम ठेवलेली आहे सदरच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे रोहित पवार गटाची कर्जत नगरपंचायतीमधून सत्ता जाणार असल्याची बाब निश्चित झालेले असून रोहित पवार यांना कर्जत मध्ये सदरचा मोठा धक्का मानला जात आहे त्यामुळे संतोष मेहत्रे यांना गटनेते कर्जत नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या सर्व सदस्यांना वीप बजावता येणार असून जे नगरसेवक सदस्य कर्जत नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये व्हिप विरोधात मतदान करतील त्यांच्यावर आपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे


