अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला गुरू मानणाऱ्या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.खरात प्रकरणी आपण आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्याशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात आपला दुरान्वयेही संबंध नाही. पोलीस तपासात या गोष्टी समोर येतीलच. हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली आहे, असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.
https://x.com/ChakankarSpeaks/status/2037568187622146538?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2037568187622146538%7Ctwgr%5Eddfc9055b421e29b03e44dbf0e9edca1cc2f2571%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmumbai%2Frupali-chakankar-resignation-ncp-womens-state-president-ashok-kharat-case-nashik-1417930
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातवर कारवाई झाली. अशोक खरातसोबत रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर टीका होऊ लागली. चाकणकर या अशोक खरातला गुरू मानायच्या, त्यामुळे या आधीच्या काही प्रकरणामध्ये चाकणकरांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचं समोर आलं होतं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षांनी दबाव टाकला. तसेच राष्ट्रवादीतील एका गटानेही ही मागणी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आधी रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.


