गुणे गंगाधर शास्त्री आयुर्वेदिक कॉलेजच्या अध्यक्षपदी सचिन जगताप यांची निवड झाल्याबद्दल भगवान महावीर ग्रुपच्या वतीने सत्कार संपन्न
काकांच्या अचानकपणे जाण्याने आमची खूप मोठी हानी – सचिन जगताप
अहिल्यानगर : वडिलांच्या निधनानंतर आयुर्वेद कॉलेजची जबाबदारी माझ्यावर पडली आहे ती मी व माझे भाऊ आमदार संग्राम जगताप आम्ही दोघे मिळून यशस्वीपणे पार पाडू, काकांची या संस्थेबद्दल असलेली श्रद्धा व विचार पुढे घेऊन जाऊ, काकांनी दिलेल्या शिकवणीनुसार काम करत राहू, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेला नावलौकिक मिळून देऊ, काकांच्या अचानकपणे जाण्याने आमची खूप मोठी हानी झाली आहे अचानक पणे पडलेल्या जबाबदाऱ्या काकांच्या प्रेरणा व विचार अंगीकारून पार पाडू असे प्रतिपादन आयुर्वेद संस्थेचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी केले
गुणे गंगाधर शास्त्री आयुर्वेदिक कॉलेजच्या अध्यक्षपदी सचिन जगताप यांची निवड झाल्याबद्दल भगवान महावीर ग्रुपच्या वतीने सत्कार संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक संजय चोपडा, अध्यक्ष राजेंद्र तातेड, राजेंद्र गांधी,विकास सुराणा, संतोष भळगट, सुनील औवसरकर, भूषण म्हसे, संतोष गांधी, राजेश दायमा, डॉक्टर सचिन बोरा, अजय गुगळे, अमित पितळे, प्रवीण शिंगवी, राज व्यास, सागर शर्मा आदी उपस्थित होते
चौकट : गुणे आयुर्वेदिक कॉलेजला १०० वर्षाची परंपरा असून या ठिकाणी हजारो विद्यार्थी घडवण्याचे काम झाले आहे स्व. माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी आयुर्वेद कॉलेजला नावलौकिक मिळवून दिला, शिस्तप्रिय काकांमुळे कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थी यांनाही त्यांच्या विचारांची सवय झाली होती. अडचणीच्या काळामध्ये पाठीमागे उभे राहणे काकांची सवय होती, सचिन जगताप व आमदार संग्राम जगताप हे आयुर्वेद कॉलेजच्या माध्यमातून काकांचे विचार पुढे घेऊन जातील अशी भावना माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी व्यक्त केली


