राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारे याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला असून सुमारे 25000 नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला. यावेळी संगमनेर तालुक्याच्या विकास आणि शांततेचे राजकारण मोडण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी हा हत्यार म्हणून काम करत असून अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले आहे.
स्वाभिमानी संगमनेर तालुका ,सकल हिंदू समाज व विविध पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडी आणि विविध आध्यात्मिक व वारकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ भव्य सद्भावना शांती मोर्चा संपन्न झाला यामध्ये तालुक्यातील 25000 नागरिकांनी सहभाग घेऊन यशोधन कार्यालय ते नवीन नगर रोड असा शांती मोर्चा केला.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मी मुलगा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही. विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची आपली तयारी आहे. हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताह मध्ये वाढण्यापासूनचे काम आपण केले आहे .गावोगावी मंदिरांचे बांधकाम व सुशोभीकरण आपण केले. सप्ताहांचे आयोजित केले. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊन आपण पुढे चाललो. कधीही धर्माचा देखावा केला नाही. चुकीचा वागला त्याला शिक्षा झाली पाहिजे हा आग्रह आम्ही धरला.
नवीन लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या अगोदर कधी भगवी टोपी घातली होती का. भगवी टोपी घातली म्हणजेच हिंदू हे चुकीचे आहे. चाळीस वर्षांमध्ये हा तालुका आपण उभा केला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली. सातत्याने विकास कामे करून तालुका राज्यात अग्रक्रमणाने पुढे नेला. हा विकास काहींना पाहवत नाही आणि म्हणून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हत्यार म्हणून आपला तालुका मोडण्याचा षड्यंत्र आखले जात आहे. मागील आठ महिन्यांमध्ये तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि दहशत वाढली आहे.
नवीन लोकप्रतिनिधी डीएनए शब्द वापरला त्याचा अर्थ तरी त्याला माहित आहे का. एक प्रकारची शिवी आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण तालुक्यात कधीही झाले नाही. तो तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे. त्याला राजकारण करायचे तर त्याने राजकीय स्टेजवर भाषण करावे. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला जात असून गावोगावी गुंड दहशत माजवत आहे. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर तालुक्याचा जो विकास झाला आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचेच योगदान आहे. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी राजकारण करत हा तालुका उभा केला. हिंदुत्व धर्म हा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे जातीभेद करण्याचा नाही. असे सांगताना ते म्हणाले की नवीन आमदाराने आमचे हिंदुत्व पाहू नये . हा तथाकथित कीर्तनकार नथुराम गोडसे चे उदातीकरण करत असेल तर आम्ही कदापि मान्य करणार नाही. आम्ही वारकरी संप्रदायाचे हिंदुत्ववादी आहोत. चार दिवसांपूर्वी मोर्चा केला त्यामध्ये खरे नाहीत. भाडोत्री लोक होते. मीही आमदार आहे. कार्यकर्त्यांनी अजिबात घाबरू नका आपल्या सर्वांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असून मी सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये असा इशारा त्यांनी दिला.डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, तालुक्यामध्ये तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे. हे आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे हा आपला आदर्श नाही. दिखाऊ हिंदुत्व आपले नाही. कारण आपण खरे हिंदू आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे .आणि तो विचार घेऊन आपण पुढे जात आहोत. यावेळी विविध संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.


