अहिल्यानगर –
अहिल्यानगर शहरातील महत्वाचे पोलिस स्टेशन म्हणून गणले जाणारे कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी नियंत्रण कक्षात असलेले संभाजी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी असे आदेश काढले आहेत.तीन दिवसापूर्वी कोतोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशनचा पदभार कोण स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे नगर जिल्ह्यातील जामखेड आणि पारनेर पोलीस स्टेशन चा परिवार त्यांनी याआधी पाहिला होता पारनेरवरून त्यांनी पुणे जिल्ह्यात बदली झाल्यानंतर पुन्हा ते अहिल्यानगर जिल्ह्यात बदली होऊन आले होते काही दिवसांपासून ते नियंत्रण कक्षात होते आता नव्याने त्यांची नियुक्ती कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी झाली आहे.


