Friday, February 20, 2026

नगरचा भूमिपुत्र काश्मीरमध्ये शहीद; दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी वीरमरण प्राप्त केलं आहे.

संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते. आपल्या कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्राणांची आहुती देऊन देशसेवा केली. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव, अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावातील जवान संदीप पांडुरंग गायकर गेल्या सात वर्षांपासून सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. २१ मे रोजी रात्रीच्या सुमाराला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लढताना त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली. सर्चऑपरेशन दरम्यान त्यांना वीरमरण आले.

संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते. सैन्यात त्यांनी आपल्या निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि धैर्यानं सेवा बजावली. देशाच्या सुरक्षेसाठी उभ्या असताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी पोहोचताच गावात शोककळा पसरली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत असताना अहिल्यानगरचे सुपुत्र जवान संदीप गायकर शहीद झाले आहेत. २१ मे रोजी रात्री दहशतवाद्यांच्या विरोधात लढा देताना त्यांनी प्राणाची आहुती दिली. संदीप गायकर हे सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. देशाची सेवा करताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles