Thursday, February 19, 2026

बायको मुलांपेक्षा तुम्ही जास्त आवडता तुमच्यावर खूप प्रेम करतो ….नगर जिल्ह्यातील सरपंचांची ग्रामसेविकेला अजब मागणी!

अहिल्यानगर: तुम्ही खूप छान दिसता,तुम्ही या ठिकाणी आलात तेव्हापासून मला खूप आवडतात. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो .माझ्या बायको मुलापेक्षा तुम्ही मला जास्त आवडतात असे म्हणून हात धरून बसण्याचा आग्रह केला करत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका गावातील माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांनी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत शासकीय सेवेत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात 14 फेब्रुवारी रोजी दाखल केली आहे.

या फिर्यादीत सदर महिलेने पुढे म्हटले आहे की, माजी सरपंच भोकरे दीड ते दोन वर्षांपासून मला वारंवार फोन करून तुम्ही आज छान साडी घातली .खूप छान दिसतात. कधीकधी तुम्ही खूप सुकलेल्या दिसतात .आज खूप टेन्शन आहे का? मी येऊ का टेन्शन दूर करायला म्हणून माझ्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत असून सदर इसमा विरुद्ध माझी तक्रार आहे असे म्हणत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आरोपीला अटक झाली नसल्याने कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने मंगळवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देऊन सदर आरोपीला दोन दिवसात अटक करा अशी मागणी केली आहे. आरोपीला दोन दिवसात अटक झाली नाही तर आम्ही सर्व काम बंद आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आणि आरोपीला अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles