अहिल्यानगर जिल्हा पोलीस को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन पदी सविता खताळ व व्हाईस चेअरमन पदी मनीषा काळे तर सचिवपदी प्रज्ञा प्रभुणे यांची एकमताने निवड
पोलीस सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर संस्था स्व भांडवली – चेअरमन सविता खताळ
अहिल्यानगर : जिल्ह्यातील पोलीस बांधव सभासदांच्या आर्थिक हितासाठी काम करणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा पोलीस को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी सविता खताळ यांची निवड झाली असून त्यांच्या नावाची सूचना अभिजीत अरकल यांनी मांडली तर अनुमोदन वैभव झिने यांनी दिले तर व्हाईस चेअरमन पदी मनीषा काळे यांची निवड झाली असून सूचक म्हणून जावेद शेख तर अनुमोदन भीमराज खर्से यांनी दिले तर सचिव पदी प्रज्ञा प्रभुणे यांची निवड झाली असून मावळते चेअरमन बाळासाहेब भोपळे तर मावळते व्हाईस चेअरमन राहुल द्वारके यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी संचालक रिचर्ड रघुवीर गायकवाड, रेवननाथ दहिफळे, सचिन शिरसाट, जावेद शेख, अभिजीत अरकल, भीमराज खर्से, संदीप जाधव, संदीप घोडके, वैभव झिने, दीपक घाटकर, लिपिक प्रकाश पाठक आदी उपस्थित होते
चेअरमन सविता खताळ म्हणाल्या की, जिल्हा पोलीस बांधव सभासदांसाठी सोसायटी काम करत असून त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात असून त्यांना तातडीने दहा लाखापर्यंत कर्ज दिले जाते सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर संस्था स्व भांडवली आहे सभासदांना घरबसल्या सोसायटीच्या सुविधा मोबाईलवर पाहता याव्यात यासाठी संस्थेचा कारभार ऑनलाईन आहे, संचालक मंडळांनी संस्थेचा चांगल्या प्रकारे कामकाज केल्यामुळे संस्था नेहमीच अ वर्गात असते, सभासद संचालक मंडळ यांच्या विश्वासामुळे चेअरमन पदावर काम करण्याची संधी महिलेला मिळाली त्या माध्यमातून चांगले काम करू असे त्या म्हणाल्या
व्हाईस चेअरमन मनीषा काळे म्हणाल्या की, पोलीस बांधव सभासद सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन व सचिवपदी महिलांना काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी संचालक मंडळाचे आभार मानते सोसायटीने सभासदाच्या सुरक्षा कवच पॉलिसी सुरू केले असल्यामुळे मयत सभासदाचे कर्ज या मधून माफ केले जाणार आहे असे त्या म्हणाल्या.
प्रज्ञा प्रभुणे म्हणाल्या की, सभासदांनी मोठ्या विश्वासाने तीन वर्षांपूर्वी १५/० असा मोठा विजय मिळवून दिला पहिल्या वर्षी संदीप घोडके चेअरमन तर व्हॉइस चेअरमन वैभव झिने यांनी काम केले होते, प्रत्येक वर्षी चेअरमन, व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक होत असते या माध्यमातून सर्व संचालकांना काम करण्याची संधी मिळत असते, सर्वांच्या एकजुटीमुळे व सोसायटीचा पारदर्शक कारभारामुळे संस्था यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत असल्याचे त्या म्हणाल्या.


