Sunday, February 22, 2026

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेत गंभीर त्रुटी,पोलीस अंमलदार निलंबित

अहिल्यानगर-विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अहिल्यानगर जिल्हा दौर्‍यादरम्यान सुरक्षेच्या व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळल्याने येथील जिल्हा विशेष शाखेतील पोलीस अंमलदार भगवान वाघुले यांना निलंबित करण्यात आले आहे. वाघुले यांनी बंदोबस्ताची आवश्यक माहिती संबंधित पोलीस ठाण्याला (तोफखाना) वेळेत न दिल्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांचे निलंबन केले आहे.सभापती शिंदे हे गेल्या शनिवार व रविवार (21 व 22 जून) रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. शनिवारी त्यांनी अहिल्यानगरमध्ये मुक्काम केला होता, तर रविवारी नेवासा तालुक्यातील विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता. मात्र रविवारी ऐनवेळी त्यांच्या दौर्‍यात बदल होऊन ते सावेडीतील माऊली संकुल येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे ठरले. या अचानक झालेल्या बदलाची माहिती अंमलदार वाघुले यांना नियंत्रण कक्षामार्फत मिळाली होती. मात्र त्यांनी ही महत्त्वाची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याला वेळेत दिली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेला अखेरच्या क्षणी गडबडीत बंदोबस्त उभारावा लागला. ही बाब सभापती शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे ती तात्काळ मांडली.

पोलीस अधीक्षक घार्गे यांनी यासंदर्भात तातडीने प्राथमिक चौकशी केली असता, वाघुले याने बंदोबस्ताबाबत कसुरी केल्याचे स्पष्ट झाले. परिणामी त्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles