Friday, October 31, 2025

शनिशिंगणापूर प्रशासनाचा मोठा निर्णय, शनी अमावस्येला चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना प्रवेशबंदी

शनिशिंगणापूर येथील शनिदेव मंदिरात दरवर्षी शनी अमावास्येला लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. देश-विदेशातून मोठ्या संख्येने शनीभक्त येथे येऊन शनिमूर्तीचे दर्शन घेतात आणि तेलाभिषेक करून मनोभावे पूजा-अर्चा करतात. मात्र यंदा अपेक्षित असलेल्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शनिअमावास्येच्या दिवशी शनिचौथऱ्यावर भाविकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.शनिअमावास्येला येत्या शनिवारी शनिशिंगणापूर येथील शनिचौथऱ्यावर जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार नाही…भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीच्या पार्श्वभूमीवर शनिचौथऱ्यावर भाविकांना प्रवेश बंदी असणार आहे…शनिअमावास्येनिमित्त देश विदेशातून लाखो शनीभक्त शनिशिंगणापुरात दर्शनासाठी दाखल होतात… यावेळी शनिचौथऱ्यावर जाऊन भाविक स्वतः शनिमूर्तीला तेलाभिषेक करतात… मात्र यंदा प्रचंड गर्दी अपेक्षित असल्याने भाविकांचे दर्शन सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी २२ ऑगस्टच्या मध्यरात्री महाआरतीपासून ते 23 ऑगस्टपर्यंत शनिचौथ्यावर दर्शन आणि तेलाभिषेक बंद ठेवण्यात येणार आहेत.

शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरभाविकांसाठी बंद
शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर मुठा नदीच्या पाण्याखाली गेले आहे. खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीत तब्बल 40 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत असून पाणी मंदिराच्या परिसरात शिरले आहे. भाविकांसाठी मंदिर तात्पुरते बंद करण्यात आले आहे. मंदिराच्या आत जवळपास पाच फूट पाणी साचले असून पायऱ्यांपैकी पाच पायऱ्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. पूर्वी 65 ते 70 हजार क्युसेक्स पाणी सोडल्यानंतरही मंदिरात पाणी शिरत नसे. मात्र, सध्या मेट्रो प्रकल्पाचे काम झाल्यानंतर फक्त 40 हजार क्युसेक्स विसर्गातच पाणी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, मंदिराच्या चारही बाजूंनी पाणी साचले असून परिसर जलमय झाला आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नदीलगतची अनेक घरेही पाण्याखाली गेली आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles