Monday, February 23, 2026

दादांच्या निधनाने कोसळलेले शरद पवार पुन्हा उभे राहिले, नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणीसाठी पोहोचले

शरद पवार नावाची व्यक्ती नेमकं काय रसायन आहे हे भल्याभल्यांना समजलं नाही म्हटलं जातं, त्याचीच पुन्हा एकदा प्रचीती आल्याचं दिसंतय. अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे स्वतः शरद पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून आलं. बारामतीतून वाहणाऱ्या नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे थेट नदीकाठी पोहोचले.अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवार हे भावुक झाल्याचं अनेकांनी पाहिलं. त्यांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली, त्याचे पुढे काय होणार अशी चर्चा सुरू झाली. त्याचवेळी आता शरद पवार हे स्वतंः राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं बारामतीकरांनी पाहिलं. शरद पवार बारामतीतून वाहणाऱ्या निरा नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. बारामती शेजारील नीरा वाघज गावात नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी शरद पवारांकडून करण्यात आली.

अनेक वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवला होता आणि स्वतः देशाच्या राजकारणात लक्ष घातलं होतं. तेव्हापासून अजित पवार बारामतीच्या समस्यांचे निराकरण करायचे. मात्र, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामतीची सूत्रे स्वतः शरद पवारांनी हाती घ्यायचं ठरल्याचं दिसतंय.

एकीकडे अजित पवारांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी पवार कुटुंबीय बारामती जवळील सोनगावमध्ये पोहचले. त्याचेवेळी शरद पवार मात्र नीरा वाघज गावात प्रदूषित नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचल्याचं दिसतंय.

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेत्यांनी सुनेत्रा पवारांनी बारामतीचं नेतृत्व करावं अशी गळ घातल्याचं दिसतंय. सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन बारामतीमधून विधानसभा लढवावी आणि उपमुख्यमंत्रिपद घ्यावं. तसेच पार्थ पवारांनी राज्यसभेवर जावं यासाठी काही ज्येष्ठ नेते प्रयत्नशील आहेत. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अस्तित्वही स्वतंत्र राहावे यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

नेमक्या त्याच वेळी आता शरद पवार पुन्हा बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. बारामती आणि शरद पवार हे जुनं नातं पुन्हा अधोरेखीत करण्याचा प्रयत्न असल्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles