स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जिल्ह्यात तीन मोठे धक्के बसले आहेत. बुलढाणा, हिंगोली आणि अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही हे नेते शरद पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते. पण आता निवडणुकीच्या तोंडावर कौटुंबिक कारण देत नेत्यांनी राजीनामा दिला आहे. हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्ष रेखे खेडेकर आणि अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके या निष्ठावंतानी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. तीन महत्त्वाच्या नेत्याने निवडणुकीत साथ सोडल्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता
बुलढाण्याच्या चिखली मतदारसंघाच्या माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखा खेडेकर यांनी अचानक आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.. राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर शरद पवार गटासोबतच राहण्याचा निर्णय घेत त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वतःच्या खाद्यांवर घेतली होती.. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हिंगोलीत मोठे खिंडार पडले आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांनी मोठा दणका दिला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या सह अनेक नगरसेवकांनी आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा राजीनामा. तब्बल ७ वर्षे पद सांभाळल्यानंतर, पक्ष फुटीच्या वेळी पवार यांच्या सोबत राहिल्यानंतर आता कौटुंबिक करण सांगत तडकाफडकी राजीनामा दिला. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आली आहे. त्यासाठी पक्षाची तयारी सुरू आहे. वरच्या पातळीवर बदल झाले आहेत. प्रदेशाध्यपदी जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे आले आहेत. फाळके यांचे पाटील यांच्याशीही चांगले संबंध होते. निवडणुकीच्या तयारीसाठी सध्या प्रदेश पातळीवर बैठका सुरू आहेत. दुसरीकडे पक्षांतरेही वेगाने सुरू झालेली आहेत. अशात फाळके यांनी पक्ष सोडला आहे. त्यांची पुढील भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


