Saturday, February 21, 2026

शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू, डॉक्टरांची प्रतिक्रिया समोर, मोठी हेल्थ अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. गोविंद बाग येथून त्यांना खासगी कारमधून पुण्याच्या दिशेने हलवण्यात आलं असून रुबी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत आहेत अशीही माहिती मिळाली आहे. शरद पवार यांना कफाचा त्रास होत असून श्वास घेण्यासही काही प्रमाणात समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने गोविंदबाग बारामती या ठिकाणाहून पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत डॉ. अभिजित लोढा यांनी माहिती दिली आहे.

शरद पवार यांच्या छातीमध्ये कफ झालेला आहे, छातीमध्ये थोडसं कजेक्शन आहे. योग्य त्या तपासण्या करण्यात येणार आहेत, आता सध्या शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत, सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थीर आहे. तपासण्यांचा रिपोर्ट आल्यानंतर जर उपचारामध्ये काही बदल करायचा असेल तर तसा बदल करू, त्यांना दोन – तीन दिवसांपासून खोकल्याचा त्रास आहे. पुढच्या दोन ते तीन तासांमध्ये रिपोर्ट मिळेल, असं लोढा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी देखील कार्यकर्त्यांना रुग्णालयात न येण्याचं आवाहन केलं आहे. ‘मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, की आपण हॉस्पिटलला आजिबात येऊ नका, इथे सर्व पेशंट आहेत, आणि आता डॉक्टरांनी जसं सांगितलं शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. मी स्वत: चर्चा केली आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याच कारण नाहीये. गेल्या दहा -बारा दिवसांपासून असलेला ताण, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की गेल्या दहा -बारा दिवसांपासून पवार साहेब अनेकांना भेटत होते, त्यामुळे थोडासा ताण आला आहे. छातीमध्ये थोडासा कफ झाला आहे, आता थोड्यावेळात रिपोर्ट येतील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles