अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांची महत्त्वपूर्ण बैठक

अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकांसाठी सिल्वर ओकवर शरद पवारांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे निरीक्षक व प्रांत उपाध्यक्ष हाजी शौकतभाई तांबोळी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पांडुरंगराव तांगडे पाटील, तसेच पक्षाचे शहराध्यक्ष ख्वाजा शरपोद्दिन मुल्ला यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली. यावेळी पक्षाचे माजी प्रांताध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत स्थानिक पातळीवर युती, जागावाटप, निवडणूक रणनीती, प्रचार यंत्रणा मजबूत करण्याबाबत, तसेच दोन्ही महानगरपालिकांसाठी स्टार प्रचारकांच्या सभा आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उबटा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्याशीही चर्चा करण्यात आल्याची माहिती दिली. आगामी काळात छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी अधिक ताकदीने उतरावी, यासाठी संघटनात्मक बांधणी व प्रभावी प्रचार यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे या बैठकीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे निरीक्षक व प्रांत उपाध्यक्ष हाजी शौकतभाई तांबोळी यांनी माहिती दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles