Friday, February 20, 2026

शेळके कुटुंबियांना जीवितास धोका ! माजी महापौर अभिषेक कळमकर यांना अटक करण्याची मागणी

माजी महापौर कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने शेळके कुटुंबियांना जीवितास धोका निर्माण झाल्याने संरक्षण देण्याची मागणी.
कळमकर यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी.
नगर (प्रतिनिधी)- कोल्हेवाडी येथील रवींद्र शेळके यांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध भिंगार पोलीस स्टेशन येथे अपहरण करून मारहाण केली याबाबत गुन्हा दाखल केला आहे याचा मनात राग धरून माझी महापौर अभिषेक कळमकर व त्याचे गुंड प्रवृत्तीचे लोक मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन खोट्या गुन्ह्यात अडकू शकतात त्यामुळे मला व माझ्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी किल्ला पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
पुढे निवेदनात म्हंटले आहे की, 18 मे 2025 रोजी भिंगार पोलीस स्टेशन येथे माजी महापौर अभिषेक कळमकर व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्याबाबत हकीकत अशी होती की रयत शिक्षण संस्थेमध्ये अभिषेक कळमकर व त्यांची पत्नी प्राची कळमकर हे नोकरी लावून देतो असे बऱ्याच लोकांकडून सांगून पैसे गोळा केले होते याबाबत सर्व माहिती व हाकिकत मला होती त्याचे सर्व व्यवहार हे माझ्या सक्षम झाले होते त्यानंतर जेव्हा मला असे समजले की अभिषेक कळमकर हे लोकांची फसवणूक करून पैसे गोळा करीत आहे ते लोकांना कोणत्याही नोकरीला लावणार नसून अभिषेक कळमकर यांना दिलेल्या पैशाचा मित्र वापर करत आहे असे समजले असता आपण हे चुकीचं करत आहात आपण हे केलं नाही पाहिजे लोकांची फसवणूक नाही केली पाहिजे परंतु त्यांनी मला धमकी दिली की तू का इतका मोठा लायकीचा नाही की तू मला ज्ञान शिकवतो व जर ही गोष्ट बाहेर बोलला तर अशा गुन्ह्यात अडकवेल की आयुष्यभर जेलमधून बाहेर येणार नाही त्यामुळे मी घाबरून कोठेही गोष्ट सांगितली नाही परंतु मी इथे नोकरी करणे योग्य वाटत नसल्याने मी नोकरी सोडून दिली तेव्हा पण माझे व अभिषेक कळमकर यांचे वाद झाले होते मी या प्रकरणी अभिषेक कळमकर यांच्या विरुद्ध भिंगार पोलीस स्टेशन येथे अपहरण करून मारहाण केली याबाबत गुन्हा दाखल केला आहे अभिषेक कळमकर व त्यांचे गुंड मृत्यूचे लोक मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन मला खोट्या गुन्ह्यात अडकू शकतात मला व माझ्या कुटुंबीयाच्या जीविताला धोका निर्माण करू शकतात मला व माझ्या कुटुंबीयांच्या जीवविताला काही हानी झाल्यास त्याची सर्व सजबाबदारी अभिषेक कळमकर व त्यांचे कुंड प्रवृत्तीचे लोक राहतील त्यामुळे कळमकर यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे देखील करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles